शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ड्रग्स जाळतात की गायीचे शेण - सुप्रीम कोर्टाचा खोचक सवाल

By admin | Updated: August 31, 2015 15:52 IST

जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३१ - जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. विद्यमान व्यवस्थेत जप्त केलेले अंमली पदार्थ ठेवण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्पष्ट नियमावली नसल्याचे ताशेरेही कोर्टाने केंद्र व राज्य सरकारवर ओढले आहेत. 
अंमली पदार्थ नष्ट करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. देशात जप्त झालेल्या अंमली पदार्थांपैकी अवघ्या ५ ते १० टक्के अंमली पदार्थच नष्ट केले जातात अशी माहिती कोर्टात देण्यात आली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पोलिसांसोबतच केंद्र व राज्य सरकारला खडे बोल सुनावले.  ४० कोटी, ५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा पोलिस करतात, पण हे अंमली पदार्थ शेवटी जातात कुठे, पुरावा म्हणून कोर्टात अंमली पदार्थांचे नमुन दिले जातात, मग उर्वरित अंमली पदार्थाचे काय होते, पोलिस खरंच अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण जाळतात असे असंख्य प्रश्नच कोर्टाने उपस्थित केले. पोलिस दलातील हवालदार, कॉन्स्टेबल, शिपाई या सारख्या कनिष्ठ पदावरील कर्मचारीच हे अंमली पदार्थ पुन्हा बाजारात विकत असल्याच्या घटना घडल्या आहेत याकडेही कोर्टाने लक्ष वेधले. पोलिसांच्या मालखान्याचीही दुरावस्था झाल्याने जप्त केलेला माल सुरक्षित कसा राहणार असा सवालही कोर्टाने उपस्थित केला.