पोलीस जोड
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
... चौकट.....
पोलीस जोड
... चौकट.....अशी सूचली कल्पनाया उपक्रमाबाबत सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह म्हणाल्या, बँकेत पगार जमा झाल्याबरोबर एसएमएस येतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा कुठे उपयोग केला तर पैसे कपात झाल्याचा एसएमएस येतो. मग पगारपत्रकच एसएमएसद्वारे पाठविता येऊ शकते का यादृष्टीने विचार करण्यात आला. कारण नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे लांब अंतरावर आहे. त्यांना पगारपत्रक टपालाने पाठविल्यास कित्येक दिवसांचा विलंब होत होता. पगाराची कपात आणि वाढ कुठे झाली, हे कळण्यास पोलिसांना बराच दिवसांचा कालावधी लागत. हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यात आम्हाला यश येऊन पगार जमा होण्याच्या बँकेच्या एसएमएससोबतच पगारपत्रकही पोलिसांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांचा त्रास कमी झाला, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. .........कोट.......बंदोबस्त आणि आपल्या कर्तव्यावर असलेल्या नागपूर ग्रामीण पोलिसांना पगार जमा होताच त्याबाबतचा तपशील एसएमएसद्वारे मोबाईलवर पाठविण्याचा उपक्रम नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. पगारपत्रक पाठविण्यात येणाऱ्या अडचणी, होणारा विलंब यामुळे कागदी पे स्लिप हातात आल्याशिवाय पैसे वाढले कुठे आणि कपात झाले कुठे हे कळायला मार्ग नव्हता. आता मात्र मोबाईलवर संपूर्ण तपशील उपलब्ध करून देण्यात येत आहे. - डॉ. आरती सिंह,पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.