शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पंतप्रधानांचे भाषण निराशाजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:28 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतकºयांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, मोदींना अद्याप गोरखपूर येथील घटनेचे गांभीर्य कळालेलेच नाही. इतर नैसर्गिक दुर्घटनांशी त्यांनी या प्रकरणाची तुलना केली आहे. अशा घटनांबाबत ते काळजीवाहू नसल्याचा आरोपही या वेळी शर्मा यांनी केला.काश्मीर प्रश्नी पंतप्रधान मोदींनी केवळ दावे करण्याचे काम केले आहे. काश्मीर प्रश्नावर खोलवर जाऊन त्यांनी माहिती देणे अपेक्षित होते, असेही शर्मा म्हणाले. त्याचबरोबर मोदींनी आपल्या भाषणात सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख केला. मात्र, हे सर्जिकल स्ट्राइक एक वर्षापूर्वी घडले आहे. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या भागात अनेक हल्ले झाले, अजूनही येथे सतत गोळीबार होतो आहे. याबाबत मोदींनी आपल्या भाषणात बोलणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी असे न करता केवळ देशातील जनतेला राष्ट्र सुरक्षित हातात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही शर्मा यांनी केला.आपल्या भाषणात भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या मोदींनी केलेल्या उल्लेखाबाबत शर्मा म्हणाले, ३१ मार्चनंतर बंद करण्यात आलेल्या नोटा अद्यापही जप्त करण्यात येत आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक गप्प का आहे?>अर्थव्यवस्थेवर विपरित परिणामसरकारला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणे हे केवळ विरोधकांनी पाठिंबा दिल्याने शक्य झाले आहे. मात्र, याचा मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्याला जबाबदार असलेले नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख त्यांनी केला नाही. देशाची अर्थव्यवस्था ‘जीएसटी’, ‘नोटाबंदी’साठी तयार नसतानाही या गोष्टी लादण्यात आल्याने अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप शर्मा यांनी केला.>‘समाजात तिरस्कार पसरवणाºया शक्तींविरोधात एकजुटीने लढायला हवे’समाजात घृणा, तिरस्काराचा प्रचार, प्रसार करणाºया शक्तींविरोधात एकजुटीने लढा द्यायला हवा, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी सर्व देशवासीयांची प्रगती तसेच समृद्धी व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.सर्व भारतीयांनी एकत्र येऊन एकजुटीने दहशतवाद तसेच समाजात तिरस्कार पसरवणाºया देशविघातक शक्तींविरोधात लढायला हवे. तसेच भारतातील मूलभूत तत्त्वांचे जतन करायला हवे. सर्व भारतीयांना सुख, समृद्धी व सुदृढ आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.>भाजपा खासदाराने फडकावला उलटा तिरंगासीतापूर : स्वातंत्र्य दिनी भाजपा खासदाराने उलटा झेंडा फडकावल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी मंगळवारी ध्वजवंदन करताना उलटा झेंडा फडकावला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत त्या उलटा तिरंगा फडकावत फोटो काढून घेत असताना दिसत आहेत. हे फोटो सीतापूरमधील महोली येथी पिसावा ब्लॉकमधील आहेत. रेखा वर्मा यांच्याशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.रेखा वर्मा यांनीही सीतापूरमधील महोली परिसरात तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. मात्र तिरंगा उलटा फडकावल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली.>सरसंघचालक भागवतांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्ननवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत असताना केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका शाळेत ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक जिल्हाधिकाºयांनी नियमांवर बोट दाखवून भागवत यांना अडवण्याचा प्रयत्न केला असला तरी भागवतांनी विरोध धुडकावून ध्वजारोहण केलेच. या घटनेमुळे केरळातील डाव्या सरकारचा आणि भाजपामधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते.