शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी काय केलंत?; माहिती आयोगाचा पीएमओला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 17:48 IST

पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला माहिती आयोगाचा सवाल

नवी दिल्ली: कोहिनूर हिरा आणण्यासाठी कोणती पावलं उचलण्यात आली, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला विचारला आहे. याशिवाय महाराजा रणजीत सिंह यांचं सोन्याचं सिंहासन, शाहजहानचा मद्यपानाचा ग्लास आणि टिपू सुलतानची तलवार यांच्यासारख्या प्राचीन वस्तू भारतात आणण्यासाठी नेमके काय प्रयत्न करण्यात आले, असा प्रश्नदेखील केंद्रीय माहिती आयोगानं उपस्थित केला आहे. कोहिनूर हिरा भारतीय लोककथेचा भाग समजला जातो. या हिऱ्यासह अनेक मौल्यवान वस्तू इंग्रज भारतातून मायदेशी घेऊन गेले होते. या वस्तूंसोबतच इतरही अनेक वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या. सध्या या वस्तू जगभरातील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंबद्दलची माहिती मिळवण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केला होता. मात्र त्या व्यक्तीचा अर्ज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे (एएसआय) पाठवण्यात आला. 'या वस्तू भारतात आणण्याचे प्रयत्न करणं आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही', असं उत्तर पुरातत्व सर्वेक्षण विभागानं या माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिलं. माहिती अधिकार कार्यकर्ते बी. के. एस. आर. अय्यंगार यांनी कोहिनूर हिऱ्यासह अनेक मौल्यवान वस्तूंची माहिती सरकारकडे मागितली होती. सुलतानगंज बुद्धा, टिपू सुलतान यांची तलवार, महाराजा रणजीत सिंह यांचं सोन्याचं सिंहासन, शाहजहान मद्यपान करण्यासाठी वापरत असलेला ग्लास, सरस्वतीची संगमरवरी मूर्ती या वस्तू भारतात आणण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले, असा प्रश्न अय्यंगार यांनी माहिती अधिकारातून उपस्थित केला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी