शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पीएमओने दिला कचरा उचलण्याचा आदेश, आता हेच काम करणार का लष्कर? नागरिकांचा संतप्त सवाल

By सागर सिरसाट | Updated: September 22, 2017 20:48 IST

पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई - पर्वतीय परिसरात पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणा-या  कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला  सांगितलं आहे. या आदेशावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लष्कराचं काम हे देशाला सुरक्षित ठेवणं असतं देशातील कचरा साफ करणं नाही अशी टीका अनेकांनी केली आहे. 

हा आदेश येताच सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल एचएस पनाग यांनी “काव-काव करणं बंद करा आणि कामावर चला ! आदेश पीएमओने दिला आहे आणि सर्व देश तुमच्या पाठिशी आहे'' असं खोचक ट्विट केलं. पनाग यांच्या ट्वीटवर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले . त्यावर उत्तर देताना त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये “आदेश आदेश असतो, पालन करावच लागतं, असं म्हटलं.  

त्यावर, ज्या परिसरामध्ये लष्कराला साफ-सफाई करण्यास सांगितलं आहे तेथे साफसफाई कर्मचारी पोहोचू शकत नाही असं ट्विट करत एका युजरने पीएमओच्या आदेशाचा बचाव केला. पण 'ज्या ठिकाणी पर्यटक किंवा भाविक जाऊन कचरा करू शकतात तर ते स्वतःचा कचरा स्वतः साफ देखील करू शकतात. सैनिक स्वतः केलेला कचरा स्वतःच साफ करत असतात' असं उत्तर पनाग यांनी दिलं. 

जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लदाख, पूर्वोत्तर भारतातील सिक्कीम आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात.  पीएमओच्या या आदेशाची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी मीडियाला दिली. अनेक पर्वतीय परिसरांमध्ये  सामान्य लोकांना पोहोचणं कठीण असतं, तरीही काही भाविक तेथे पोहोचण्यात यशस्वी होतात. त्या परिसरांतील परिस्थितीमुळे तेथे असलेला कचरा कधी साफ करता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणं हा देखील स्वच्छता अभियानाचा एक उद्देश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारIndian Armyभारतीय जवान