शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स असणाऱ्यांनी व्हा अलर्ट, खात्यात ३४२ रुपये नसतील तर बसेल ४ लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:12 IST

Banking Alert News: जर तुम्हीही नेहमी बँक अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स ठेवत असाल किंवा बॅलन्सच टेवत नसाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी वाचल्याने आणि त्यादिशेने पावले उचलल्याने तुमचे चार लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळू शकते.

मुंबई -  जर तुम्हीही नेहमी बँक अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स ठेवत असाल किंवा बॅलन्सच टेवत नसाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी वाचल्याने आणि त्यादिशेने पावले उचलल्याने तुमचे चार लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळू शकते. हो, पहिल्यांदा तुम्हाला ही बाब गंमत वाटेल मात्र ती अगदी खरी आहे. त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना रिन्यू करण्याची तारीख जवळ आली आहे. 

सरकारच्या या दोन्ही योजनांना वार्षिक आधारावर रिन्यू करण्यासाठी अंतिम तिथी ३१ मे आहे. जर तुमच्या खात्यामध्ये योग्य बॅलन्स नसेल आणि या दोन्ही योजना रिन्यूअल झाल्या नाहीत तर तुम्हाला चार लाख रुपयांचा विमा मिळणार नाही. त्यामुळे तुमचे चार लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात या योजनांच्या अटीशर्तींबाबत.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेमध्ये कुठल्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूसाठी संरक्षण दिलं जातं. १८ ते ५० वर्षांदरम्यान तुम्ही या योजनेशी संलग्न होऊ शकता. ५० वर्षांच्या वयापूर्वी या विमा योजनेशी जोडले गेल्यास आणि प्रीमियमचा भरणा केल्यास तुमच्या जीवनाला ५५ व्या वर्षापर्यंतच कव्हर मिळेल. 

सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्हाला ३३० रुपये प्रतिवर्ष भरणा केल्यावर २ लाख रुपयांचे जीवन विमा कव्हर मिळू शकेल. याची नोंदणी तुम्ही बँकेची शाखा, बीसी पॉईंट किंवा पोस्ट ऑफीसमधून करू शकता. योजनेमध्ये प्रीमियम तुमच्या अकाऊंटमधून ऑटो डेबिट होईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये कुठल्याही दुर्घटनेमुळे होणारे मृत्यू किंवा अपंगतेसाठी सुरक्षा कव्हर दिलं जातं. या योजनेमध्ये तुम्ही १८ व्या वर्षापासून ७० व्या वर्षापर्यंत जोडले जाऊ शकता. या योजनेंतर्गत दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास १ लाख रुपये देण्याची तरतूद आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम १२ रुपये आहे. याअंतर्गत दोघांचेही एकूण प्रीमियम एकूण २४२ रुपये एवढा होतो. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकInvestmentगुंतवणूक