शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, भटिंडाच्या एसएसपींसह 5 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 08:55 IST

PM security breach: बुधवारी, काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जवळपास 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून राहिला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले.

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान 'सुरक्षेत मोठी चूक' केल्याबद्दल भटिंडा पोलीस प्रमुखांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शुक्रवारी येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भटिंडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अजय मलुजा आणि इतर पाच अधिकारी पंतप्रधानांच्या 5 जानेवारीला राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार होते. यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, गृह मंत्रालय हे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकार्‍यांचे संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आहे.

बुधवारी, काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जवळपास 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून राहिला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले. गृह मंत्रालयाने या घटनेला सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "होय, आम्ही भटिंडा एसएसपीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सुरक्षेतील गंभीर त्रुटींबद्दल त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे." अजय मलुजा हे सध्या भटिंडाचे एसएसपी आहेत.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यात कर्तव्यावर असलेल्या पंजाब पोलिसांच्या किमान पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. इतर अधिकार्‍यांची ओळख तात्काळ उघड झाली नाही, परंतु सूत्रांनी सांगितले की ते एसएसपी, डीआयजी आणि त्याहून अधिक दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. गृह मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीसद्वारे, अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील), नियम, 1969 मध्ये विहित केलेल्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह कायद्यानुसार कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सचिव (सुरक्षा), कॅबिनेट सचिवालय सुधीर कुमार सक्सेना यांच्या नेतृत्त्वाखाली इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक बलबीर सिंग आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) आयजी एस सुरेश यांची समिती स्थापन केली आहे. केंद्राने समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब