शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची पंतप्रधानांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 01:23 IST

सर्वपक्षीय बैठक; फारुक अब्दुल्लांच्या अटकेबद्दल धारेवर धरले

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दर्शविली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारुक अब्दुल्ला यांना केलेल्या अटकेचा मुद्दा विरोधी पक्षीयांनी सर्वपक्षीय बैठकीत लावून धरला. अब्दुल्ला यांना संसद अधिवेशनास उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.देशातील आर्थिक मंदी, बेकारी, शेतकऱ्यांची दुरवस्था, अशा विषयांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला २७ पक्षांचे नेते हजर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, संसद सभागृहांचे नियम व कामकाज पद्धतीच्या चौकटीत राहून सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार आहे. या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, काँग्रेस नेते आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, लोकजनशक्तीचे नेते चिराग पासवान आदी उपस्थित होते.खासदाराला अवैधरीत्या अटक कशी होऊ शकते?फारुक अब्दुल्ला यांना केलेल्या अटकेचा मुद्दा नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार हसनैन मसुदी यांनी या बैठकीत उपस्थित केला. एखाद्या खासदाराला अवैधरीत्या अटक कशी होऊ शकते, असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सरकारला विचारला. फारुक अब्दुल्ला यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद