शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार; मोठ्या घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 08:38 IST

सकाळी ९ वाजता मोदी देशवासीयांशी संवाद साधणार; मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. सकाळी ९ वाजता ते देशाशी संवाद साधतील. मोदी नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आज पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. त्याआधी ते देशवासीयांशी संवाद साधतील.

पंतप्रधान कार्यालयानं सकाळी ८ च्या सुमारास मोदींच्या आजच्या कार्यक्रमांची माहिती दिली. 'आज गुरुनानक जयंती आहे. आज पंतप्रधान सिंचन योजनांच्या लोकार्पणासाठी उत्तर प्रदेशमधल्या महोबा येथे जातील. त्यानंतर ते संध्याकाळी झांसीमध्ये राष्ट्र संरक्षण समर्पण पर्वात सहभागी होतील. त्याआधी ते सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करतील,' असं पीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात कोरोना महामारी आणि लसीकरणाचा विषय होता. याच विषयाला धरून पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानं लसीकरणाकडे पाठ फिरवली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी घर घर दस्तक अभियान राबवण्यात येत आहे. त्याबद्दल मोदी आज बोलू शकतात.

आज गुरुनानक जयंती आहे. पंजाबमधील कोट्यवधी लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षभरापासून तीन कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यात पंजाबमधील शेतकऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे मोदी या अनुषंगानं काही बोलतील अशीही शक्यता आहे. विशेष म्हणजे मोदी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते जनसभेला संबोधित करणार आहेत. मात्र तरीही त्याआधी मोदी राष्ट्राला संबोधित करणार असल्यानं त्यांच्या आजच्या संबोधनाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी