शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Triple Talaq Bill : आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला  - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:49 IST

'संपूर्ण देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे.'

नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक अशा तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला आज मंजुरी मिळाली. या विधेयकावर घेण्यात आलेल्या मतमोजणीदरम्यान विधेयकाच्या बाजूने 99 आणि विरोधात 84 मते पडली. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. 

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या विधेयकाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "संपूर्ण देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला असून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या तिहेरी तलाकच्या कुप्रथेपासून आज पीडित मुस्लीम महिलांना न्याय मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो."

याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, "तिहेरी तलाक बिल मंजूर होणे म्हणजे महिला सशक्तिकरणच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली देशातील करोडो माता-भगिनींना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेण्याचे पाप केले. मला गर्व आहे की, मुस्लिम महिलांना त्यांचा अधिकार देण्याचा गौरव आमच्या सरकारला मिळाला आहे."

दरम्यान, मोदी सरकार परत सत्तेवर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने हे विधेयक लोकसभेत पुन्हा एकदा पारीत झाले होते. मात्र राज्यसभेत भाजपा आणि मित्रपक्षांकडे बहुमत नसल्याने या विधेयकाचे काय होणार याकडे सर्वांकडे लक्ष लागले होते. अखेर मित्रपक्षांचा सभात्याग आणि विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही आवश्यक संख्याबळाची पूर्तता करण्यात यश आल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtriple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभा