शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नरेंद्र मोदी पाच दिवस अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर जाणार, PMO कडून माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 15:54 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ज्यो बायडन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून ते 25 जून या कालावधीत अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पीएमओ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ज्यो बायडन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींचा दौरा न्यूयॉर्कमध्ये सुरू होईल, जिथे ते 21 जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील. यानंतर ते 22 जून रोजी राजकीय मेजवानीचे आयोजन करतील. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी 22 जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनालाही संबोधित करणार आहेत.

नरेंद्र मोदी 23 जून रोजी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे देशभरातील आमंत्रित समुदाय नेत्यांना संबोधित करतील. यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष  कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करतील. दरम्यान, या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमधील अनेक आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), व्यावसायिक आणि इतर भागधारकांशी संवाद साधणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

24 आणि 25 जूनला मोदी इजिप्तला भेट देणारआपल्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नरेंद्र मोदी 24 ते 25 जून या कालावधीत इजिप्तला भेट देण्यासाठी कैरोला पोहोचतील. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून हा दौरा आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून इजिप्तचे राष्ट्रपती भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा असणार आहे. "राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्याव्यतिरिक्त नरेंद्र मोदी इजिप्शियन सरकारच्या वरिष्ठ मान्यवरांशी, काही प्रमुख इजिप्शियन व्यक्तींशी तसेच इजिप्तमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची शक्यता आहे," परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचबरोबर, "भारत आणि इजिप्तमधील संबंध हे प्राचीन व्यापार आणि आर्थिक संबंधांवर आधारित आहेत. तसेच, दोन्ही देशांमध्ये खोल सांस्कृतिक आणि लोकांशी संबंध आहेत", असे मंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका