शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 13:08 IST

आयटीपीओ कॉम्प्लेक्समध्ये हवन आणि पूजेनंतर नरेंद्र मोदींनी कामगारांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

नवी दिल्ली : भारतात G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित केलेले आयटीपीओ (ITPO) कॉम्प्लेक्स सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6.30 वाजता आयटीपीओ कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करणार आहेत. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी कॉम्प्लेक्समध्ये पूजा केली. तसेच, आयटीपीओ कॉम्प्लेक्समध्ये हवन आणि पूजेनंतर नरेंद्र मोदींनी कामगारांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

आयटीपीओ कॉम्प्लेक्स सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीसाठी बनवण्यात आले आहे. हे सुमारे 123 एकरमध्ये पसरलेले आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) च्या मालकीच्या जागेच्या पुनर्विकासाची जबाबदारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आली होती. याशिवाय, या कॉम्प्लेक्सची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत.  

जवळपास 2700 कोटी रुपयांचा खर्च करून आयटीपीओ कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (MICE-Meting, Incentives, Conferences and Exhibitions) आहे. या लेव्हल थ्री कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 7000 हून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. या कॉम्प्लेक्समध्ये पाहुण्यांच्या सोयीसाठी 5500 हून अधिक पार्किंगची जागा तयार करण्यात आली असून त्यामुळे वाहने पार्क करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

व्यवसाय आणि नेटवर्किंगसाठी उत्तम व्यासपीठ!कॉम्प्लेक्समध्ये जागतिक स्तरावर मेगा परिषद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातील. यामध्ये उत्पादने, नवकल्पना आणि विचारांचे प्रदर्शित करण्यासाठी सात नवीन  प्रदर्शनी हॉल देखील आहेत. हे अत्याधुनिक हॉल प्रदर्शक आणि कंपन्यांना आपल्या प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी, व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करेल.

कॉम्प्लेक्सचे सौंदर्य मन मोहून टाकेलG20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या या कॉम्प्लेक्सचे सौंदर्य असे आहे की, जो कोणी पाहील तो आनंदित होईल. कॉम्प्लेक्सच्या गुणवत्तेमुळे, जगातील 10 सर्वात मोठ्या प्रदर्शन आणि अधिवेशन संकुलांच्या यादीत या कॉम्प्लेक्सचा समावेश करण्यात आला आहे. हे IECC कॉम्प्लेक्स जर्मनीमधील हॅनोव्हर एक्झिबिशन सेंटर आणि शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन सेंटरला टक्कर देऊ शकते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली