शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : “वाढदिवशी आईकडे जाऊ शकलो नाही, पण याचा खूप आनंद आहे की...”: मोदींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 20:00 IST

Narendra Modi : वाढदिवसानिमित्त कराहल शहरातील मॉडेल स्कूल मैदानावर महिला बचत गटांच्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. भाजपा नेते आणि मोदी समर्थक आज मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त कराहल शहरातील मॉडेल स्कूल मैदानावर महिला बचत गटांच्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "वाढदिवशी मी सहसा माझ्या आईला भेटण्याचा प्रयत्न करतो. तिचा आशीर्वाद घेतो. आज मी माझ्या आईकडे जाऊ शकलो नाही पण मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात, प्रत्येक गावात कष्ट करणाऱ्या लाखो माता मला आशीर्वाद देत आहेत” असं म्हटलं आहे. 

“आज जेव्हा माझ्या आईला हे दृश्य दिसेल तेव्हा तिला नक्कीच समाधान होईल की लाखो मातांनी मला आशीर्वाद दिला आहे. ती आनंदी होईल. तुमचे आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी एक महान शक्ती, महान ऊर्जा, प्रेरणा आहेत. माझ्यासाठी देशाच्या आई, बहिणी, मुली हे माझे सर्वात मोठे संरक्षण आहे. शक्तीचा स्रोत आहेत. ती माझी प्रेरणा आहे” असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे काही धडाकेबाज निर्णय घेतले त्या निर्णयांची चर्चा वाढदिवसानिमित्त सुरू आहे. मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे देशात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या निर्णयाची केवळ देशानेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नोंद घेण्यात आली. यामध्ये कलम 370,  इंडिया गेट, अर्थसंकल्पाची तारीख, सीएए, एआरसी,आंतरराष्ट्रीय योग दिवस, जलशक्ती मंत्रालय, बालाकोट एअर स्ट्राइक, नोटबंदी, सरकारी बँकांचे विलिनिकरण, लॉकडाऊन, दिल्लीच्या रेस कोर्स रोडचे नाव, सेंट्रल व्हिस्टा, सर्जिकल स्ट्राईक, राजपथ झाले कर्तव्यपथ, किसान सन्मान निधी योजना, नीति आयोग, जीएसटी, राम मंदिर, वन नेशन, वन रेशन कार्ड, नौदल, ट्रिपल तलाक कायदा, वॉर मेमोरियल,  इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी