शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 09:53 IST

PM Narendra Modi:मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 नेत्यांच्या यादीत मोदी अव्वलस्थानी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सहाव्या क्रमांकावर आहेत.

नवी दिल्ली: पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास 71 टक्के रेटिंगसह आवडत्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव अव्वलस्थानी आहेत. दुसरीकडे जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 43 टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत जो बिडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक लागतो, ज्यांना 43 टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाली आहे.

यापूर्वीही मोदी अव्वलस्थानीनोव्हेंबर 2021 मध्येही जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

अशी ठरते रेटिंगलोकप्रिय नेत्यांची रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या सरासरीवर आधारित आहे. नमुन्यांचा आकार देशांनुसार बदलतो. याच वेबसाइटने मे 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना 84 टक्के मंजुरीसह सर्वोच्च रेटिंग दिली होती. जी मे 2021 मध्ये 63 टक्क्यांवर आली. ताजी रेटिंग 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडन