शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

PM Narendra Modi Live : १०० कोटी डोस हा केवळ एक आकडा नाही, हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 10:13 IST

महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत असल्याचं पंतप्रधानांचं वक्तव्य.

ठळक मुद्देमहासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत असल्याचं पंतप्रधानांचं वक्तव्य.

गुरुवारी भारतानं १०० कोटी करोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पार केला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात वेद वाक्यानं केली. आपल्या देशानं एकीकडे कर्तव्याचं पालन केलं आणि दुसरीकडे यशही मिळालं, असं मोदी यावेळी म्हणाले. गुरूवारी भारतानं १०० कोटी डोसचं कठीण लक्ष पार केलं. यामागे देशवासीयांचा पाठिंबाही होता. हे देशवासीयांचं, भारताचं यश आहे. १०० कोटी डोस हे केवळ एक आकडा नाही. हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहे. इतिहासाच्या नव्या अध्यायाची रचना आहे. कठिण ध्येयापर्यंत पोहोचणं जाणतो अशा भारताचं हे प्रतिबिंब आहे, असं मोदी देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले.

"आज अनेक लोकं अन्य देशांशी या लसीकरणाची तुलना करत आहेत. जगातील अन्य देशांसाठी लसीवर रिचर्च करणं, ते शोधणं यात ते एक्सपर्ट होते. आपण अनेक लसी बाहेरून मागवत होतो. जेव्हा १०० वर्षांमधील मोठी महासाथ आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित करण्य़ात आले. भारत लसी कुठून आणणार, पैसे कसे उभारणा, महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत आहे. आज भारतानं १०० कोटी डोस मोफत दिले आहे. आज जग भारताला कोरोनापासून भारताला सर्वात सुरक्षित मानेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आज जग भारताची ताकद पाहत आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक"भारतानं इतिहास रचला आहे. आपण भारतीय विज्ञान, उद्योग आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार बनत आहोत. लसीकरणात १०० कोटींचा आकडा पार करण्यावर भारताला शुभेच्या. आपले डॉक्टर्स, नर्स आणि त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी हे ध्येय गाठण्यास मदत केली," असं म्हणत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

Co-Win अॅपचं कौतुक"आपण वेगानं लसीकरण करण्यासाठी एक यंत्रणा उभारली. कोविन अॅपचं आज जगभरातून कौतुक होत आहे. १०० कोटॉ डोस पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु भारतानं ते शक्य करून दाखवलं. भारतानं त्यासाठी एक यंत्रणा उभारली. लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानं विज्ञानाची साथन सोडली नाही. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेन नवा उत्साह आला," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

कोणताही भेदभाव नाहीकोणताही भेदभाव न करता भारतानं विक्रमी लसीकरण करून दाखवलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोणतंही व्हिआयपी कल्चर शिरू दिलं नाही. यासर्वांमध्ये देशवासींचे प्रयत्न असल्याचंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस