शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

५ नव्या वंदे भारत, २ अमृत भारत एक्स्प्रेस; PM मोदी करणार लोकार्पण, अयोध्येला काय-काय मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 19:10 IST

Vande Bharat Express And Amrit Bharat Train: पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, वंदे भारत, अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Vande Bharat Express And Amrit Bharat Train ( Marathi News ): देशभरातून वंदे भारत ट्रेनना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशातील अनेक ठिकाणांहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांचा अयोध्या दौरा असून, यावेळी तब्बल पाच वंदे भारत एक्स्प्रेस, दोन अमृत भारत एक्स्प्रेस, अयोध्या रेल्वे स्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केले जाणार आहे. 

कमी तिकीट, अद्ययावत सोयी आणि वेगवान प्रवास अशा अनेक सुविधांसह अमृत भारत ट्रेन बांधण्यात आली. देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अखेर अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. नवी दिल्ली ते दरभंगा या मार्गावर पहिली अमृत भारत ट्रेन चालवली जाणार असून, या मार्गावर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थळ अयोध्या ते सीता मातेचे जन्मस्थळ असलेले सीतामढी ही दोन्ही स्थानके असणार आहेत.

५ वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण, मुंबईतून एक सेवा होणार सुरू

अमृत भारत ट्रेनसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाणार आहे. अयोध्या-आनंद विहार वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान,  दुसरी अमृत भारत ट्रेन मालदा-बंगळूरु दरम्यान चालवण्यात येणार आहे. अमृत ​​भारत ट्रेन श्रमिक आणि कामगारांना डोळ्यासमोर ठेऊन चालवल्या जात आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यांमधून तेलंगणा, दिल्ली, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चालवल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAyodhyaअयोध्या