शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद; लसीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 22:43 IST

Coronavirus Vaccine : यापूर्वी अमेरिकेनं कोरोनाच्या लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली होती बंदी.

ठळक मुद्देयापूर्वी अमेरिकेनं कोरोनाच्या लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली होती बंदी.परंतु नंतर वाढलेल्या दबावामुळे बायडेन यांनी आडमुठी भूमिका सोडली

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे राष्ट्राध्यक्षपदी असताना कोरोनाचा (Corona Pandemic) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती. मात्र, आता भारतामध्ये कोरोनाने (India) हाहाकार माजविलेला असताना अमेरिकेने (America) मदत करण्यास नकार दिला होता. यामुळे अडचणीत आलेल्या जो बायडेन (joe biden) सरकारने लगेचच यू-टर्न घेत आताचा आमच्या मदतीची वेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. "आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसंच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले," अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. "लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते," असंही ते म्हणाले. 

लसीच्या कच्च्या मालावरील बंदी अमेरिका हटवणार मागील काही दिवसांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जॅक सुलविन यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमेरिकेनं लसीकरणासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला गती मिळणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोविशील्ड लस तयार करते. यासाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेहून येतो. मात्र अमेरिकेनं कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे लस उत्पादन अडचणीत आलं. मात्र दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी संवाद साधल्यानंतर ही निर्यातबंदी मागे घेण्यात आली. अमेरिकेनं भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय अमेरिकेच्या आरोग्य खात्यातील तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.भारतातील लस उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी अमेरिकेनं लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याशिवाय अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला २०२२ च्या अखेरपर्यंत १०० कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIndiaभारत