शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आशियातील सर्वांत मोठ्या सौर प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 03:38 IST

भारत आता जगातील पाचवा मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. भारत हा स्वच्छ ऊर्जेची जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील रेवा येथे उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या संबोधनात मोदी यांनी संबोधित केले.  ‘या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश राज्य देशातील स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचे सर्वांत मोठे भांडार म्हणून उदयास येईल.’७५० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना मोदी यांनी म्हटले की, सौरऊर्जा ही वर्तमानाचेच नव्हे, तर २१व्या शतकातील ऊर्जेचे माध्यम ठरणार आहे. कारण या माध्यमाद्वारे मिळणारी वीज खात्रीशीर, स्वच्छ आणि सुरक्षित आहे. भारत आता जगातील पाचवा मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. भारत हा स्वच्छ ऊर्जेची जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. रेवा प्रकल्पातून उद्योगालाच नव्हे, तर दिल्लीच्या मेट्रो रेल्वेलाही वीज मिळेल. शाजापूर, नीमच आणि छत्तरपूर येथील सौरऊर्जा प्रकल्पांचे कामही प्रगतिपथावर आहे. मोदी यांनी म्हटले की, मागील सहा वर्षांत ३६ कोटी एलईडी बल्बचे वितरण देशभरात करण्यात आले आहे. रस्त्यांवरील दिव्यांच्या स्वरूपात १ कोटी एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. हे सरकारचे मोठे पाऊल ठरले आहे. त्यातून ऊर्जेची मोठी बचत होत आहे.रेवा प्रकल्पात २५० मेगाावॅट क्षमतेचे तीन युनिट आहेत. हा प्रकल्प ५00 हेक्टरवर पसरलेला आहे. १,५00 हेक्टरच्या सोलार पार्कच्या आत हा प्रकल्प आहे.‘रेवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड’ने हा सोलार पार्क विकसित केला आहे. यात मध्य प्रदेश ऊर्जा विकास महामंडळ, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांची भागिदारी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशelectricityवीज