शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी कोणामुळे मिळाली नाही? PM मोदींनी थेट नावच घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 14:59 IST

PM Narendra Modi: २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत NDAचा विजय होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची  INDIA आघाडी आणि सत्ताधारी NDA मध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी यांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, याचे कारण सांगितले. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचा आहे. त्याचसोबत आगामी निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र दिले. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण राज्य आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी कोणामुळे मिळाली नाही?

काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, असे विधान पंतप्रधान मोदींनी या बैठकीत केल्याचे समजते. काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती देण्यात आली. सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार असल्याचा विश्वास मोदी यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार