शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मंत्र्यांनी वेळेत कार्यालयात पोहोचा अन् तिथूनच काम करा, मोदींच्या मंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 10:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात की, काम करत राहणं हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. ज्या पद्धतीनं मोदींना जनाधार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी कामाचा झपाटाही वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मंत्र्यांनी घरातून काम करणं टाळावं अन् सकाळी 9.30पर्यंत आपापल्या कार्यालयात पोहोचावं, अशा सूचना मोदींनी मंत्र्यांना दिल्या होत्या. 

मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अधिकाऱ्यांबरोबरच वेळेत कामावर पोहोचत होतो. त्याचा प्रभाव प्रशासनाच्या खालच्या स्तरावरही जाणवत होता. फायलींचा निपटारा करण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या सहाय्यक मंत्र्यांनी एकत्र बसून प्रस्तावांना मंजुरी दिली पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. वेळेत कामावर पोहोचण्याचा सल्ला देत मोदी म्हणाले, सर्वच मंत्र्यांनी कार्यालयात पोहोचल्यानंतर काही मिनिटं वेळ काढून अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयातील कामकाज समजून घेतलं पाहिजे. तसेच पक्षाच्या खासदारांनी जनतेला भेटत राहिलं पाहिजे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहण करण्यापूर्वीही सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना काही सल्ले दिले होते. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधानं करणं चूक आहे. अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. दिल्लीतली परिस्थिती नव्या खासदारांना एकदम समजणार नाही, त्यामुळे वरिष्ठ खासदारांनी त्यांना सांभाळून घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी