शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अयोध्या प्रकरणावर मोदींची 'मन की बात'; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 12:45 IST

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल पुढील महिन्यात येण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये सरदार पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करत अयोध्या प्रकरणावर भाष्य केलं. सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यावेळी देश एकता आणि अखंडतेच्या बाबतीत किती सतर्क आहे, याची प्रचिती आली. २०१० मध्ये न्यायालयानं राम मंदिर प्रकरणी निकाल दिला. त्यावेळी काहींनी वाचाळपणा केला. मात्र संपूर्ण देशातील जनतेनं आनंददायक बदल अनुभवला, असं मोदी 'मन की बात'मध्ये म्हणाले.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार, समाज, साधू-संतांनी अतिशय शांतपणे प्रतिक्रिया दिल्या. निकालाचा दिवस जेव्हा जेव्हा मला आठवतो, तेव्हा अतिशय आनंद होतो. त्यावेळी देशानं न्यायालयाच्या निर्णयाचा, प्रतिष्ठेचा सन्मान केला होता. तो क्षण आमच्यासाठी कायम एक उत्तम उदाहरण असेल, असं मोदी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून नोव्हेंबरमध्ये निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. मन की बातमध्ये मोदींनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचादेखील उल्लेख केला. हैदराबाद आणि जुनागढचं नव्हे, तर लक्षद्विपसारख्या बेटाचंही भारतात विलीनीकरण व्हावं यासाठी प्रयत्न केले. लक्षद्विपचं विलीनीकरण करून पटेल यांनी शेजारी देशाचे मनसुबे धुळीस मिळवले. पटेल यांची नजर चौफेर होती. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रदेशांसोबतच लक्षद्विपसारख्या भागांचीदेखील चिंता होती, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर