शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

Video: कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना मोदी काय म्हणाले होते?; पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 10:15 IST

राजनाथ सिंह ट्रोल झाल्यानंतर मोदींचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या राफेल विमानाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये पूजा केली. राजनाथ यांनी विमानावर ओम काढला आणि त्याच्या चाकाखाली लिंबूदेखील ठेवला. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी राजनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. तर काहींनी त्यात काय चुकलं, यावरुन इतका गहजब करण्याचं कारण काय, असे प्रश्नदेखील उपस्थित केले.राफेलच्या चाकाखाली ठेवलेल्या लिंबांमुळे राजनाथ सोशल मीडियावर ट्रोल झाले. परदेशात जाऊन राजनाथ यांनी केलेल्या कृतीमुळे भारताबद्दल नेमका काय संदेश जगभरात गेला, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. लिंबू ठेवण्यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे, असा सवाल सोशल मीडियानं विचारला. मात्र असं याआधाही घडलंय. दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्राची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, असा प्रतिवाद काही जणांकडून करण्यात आला. राफेलच्या चाकाखाली ठेवण्यात आलेल्या लिंबांची चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदींनी अंधश्रद्धेवर भाष्य करताना दिसत आहे. ३० सेकंदांच्या या व्हिडीओत त्यांनी कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना टोला लगावला आहे. 'त्यांनी कारवर लिंबू आणि मिरची लावली... आणि न जाणे आणखी काय काय.. हे लोक देशाचं काय करणार आहेत?,' असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आहे.Video: तेव्हा मोदी म्हणाले होते, लाकडात जीव असतो; आम्ही लाकडं कापू शकत नाहीयाआधी आरेत झालेल्या वृक्षतोडीनंतरही मोदींचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये मोदींनी वृक्षतोडीवर भाष्य केलं होतं. हा व्हिडीओ मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमातील होता. यामध्ये मोदी बेअर ग्रिल्सला लाकडाचं महत्त्व आणि पावित्र्य सांगताना दिसत आहेत. 'तेव्हा उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावं लागायचं. तेव्हा माझे काका विचार करत होते. चूल पेटवण्यासाठी जे लाकूड कामी येतं, त्या लाकडाचा व्यापार करू. त्यांनी दुकानासाठी जागा घेतली. त्यांनी ही गोष्ट आजीला सांगितली. आजीनं त्यांना रोखलं. ती नाही म्हणाली. उपाशी मरू, मजुरी करू. पण लाकडं विकायची नाहीत. कारण लाकडात जीव असतो. त्यामुळे आपण लाकडं कापू शकत नाही. त्यामुळे माझ्या आजीनं काकांना ते काम करू दिलं नाही. कारण आमच्यावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार आहेत', असं मोदींनी मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये बेअर ग्रिल्ससोबत संवाद साधताना म्हटलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंह