शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

गुजरातच्या बड्या नेत्यांसोबत PM मोदींची बैठक; आपनं विचारलं, "भीतीमुळे निवडणुकीची लवकर तयारी...?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 05:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री, कायदामंत्री आणि मुख्य सचिवदेखील उपस्थित होते.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीला (Gujarat Assembly Election) आठ महिन्यांचा कालावधी उरला असतानाही भाजपने त्यासाठीची आता जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर राज्य नेत्यांची सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी आणि मुख्य सचिव कैलाशनाथन उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत भाजपकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचवेळी आम आदमी पक्षाने या बैठकीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

गुजरातमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पुढील आठवड्यात विधानसभा बरखास्त करणार का?, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी भाजपला केला आहे. "भाजप पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा बरखास्त करणार का?, 'आप'ची इतकी भीती?," असा सवाल करत केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार निशाणा साधला. वर्षअखेरिस निवडणुकाया वर्षाच्या अखेरिस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये विजय मिळवणारा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेतही नशीब आजमवण्याच्या तयारीत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गुजरातमध्ये रोड शो केले होते. मला राजकारण करता येत नाही, भ्रष्टाचार संपवता येतो. पंजाबमध्ये भगवंत मान यांनी भ्रष्टाचार संपवला आहे, आता गुजरातची वेळ, असं यादरम्यान केजरीवाल म्हणाले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातElectionनिवडणूक