शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आज पाहणार मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड; 'या' मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 07:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. त्या कामांच्याच आधारे मंत्र्यांना रँकिंग बहाल केलं जाणार असून, त्याच्या आधारवरच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहेत. तसेच कामचुकार मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली असून, त्यात सर्व मंत्र्यांना आपले रिपोर्ट कार्ड्स सादर करण्यास सांगितले आहे. या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणार आहेत.मोदी सरकार 2 ने अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर त्यातून उद्भवलेली परिस्थिती निवळण्यात सरकारचा वेळ गेला. तिहेरी तलाक, कलम 370 आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा यांसारखे निर्णय मोदी सरकारने घेतले होते. त्यामुळे अनेक भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या महत्त्वाच्या निर्णयादरम्यान मंत्र्यांच्या कामगिरीची आढावा घेणं मोदींना शक्य झालेलं नव्हतं. मंत्र्यांचं मूल्यमापन केल्यानंतर चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांना बढती दिली जाऊ शकते आणि ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यांना पदावरून हटवलंही जाण्याची शक्यता आहे. मंत्री आपले रिपोर्ट कार्ड मोदींसमोरच मांडणार असल्याची शक्यता असल्यानं मंत्र्यांच्या समोरच सर्वकाही स्पष्ट होणार आहे. जास्त करून महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळणाऱ्या मंत्र्यांवर मोदींचं लक्ष राहणार आहे.नवी चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचाही मोदींचा विचार असून, मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी या बैठकीतून अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्या मंत्र्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यांना बढती मिळणार आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार दर्जाची आणि असमाधानकारक आहे, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय भूमिका घेणार हे आजच्या बैठकीनंतरच समजणार असून, केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी