शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

वायनाडला सर्वताेपरी मदत करण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला शब्द, पीडितांना धीर दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 13:22 IST

भूस्खलनग्रस्त भागाला भेट, वायनाडमधील मदत आणि बचावकार्याची घेतली माहित

वायनाड (केरळ): केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या बचाव व पुनर्वसन कार्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करील, अशी ग्वाही पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली.पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी येथील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देऊन बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला. नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, सर्व भारतीयांच्या प्रार्थना आणि सद्भावना भूस्खलन पीडितांसोबत आहेत. या आपत्तीने असंख्य कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त केली आहेत. या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना साह्य करण्यासाठी केंद्र सरकार केरळ सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

या भूस्खलन दुर्घटनेत आतापर्यंत २२६ लोक मरण पावले असून १३० लोक अजूनही बेपत्ता आहेत.केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, घटनास्थळी तळ ठोकून असलेले मंत्रिमंडळ उपसमितीतील मंत्री, सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांची बैठकीला उपस्थिती होती. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेेल्या रुग्णांची त्यांनी विचारपूस केली, नातेवाईकांना धीर दिला. 

...अन् अश्रूंचा बांध फुटला

भूस्खलनग्रस्त नागरिकांसाठी उभारलेल्या मदत छावणीलाही मोदी यांनी भेट दिली. सर्वस्व गमावलेल्या २ मुलांसह काही आपदग्रस्तांशी संवाद साधून त्यांनी घटनेची माहिती घेतली तसेच पीडितांची दु:खे जाणून घेऊन त्यांना धीर दिला. मोदी यांनी पीडितांच्या डोक्यावरून व खांद्यावरून मायेचा हात फिरवला तेव्हा पीडितांचा अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले.

‘ते’ आता मणिपूरलाही जातील : काँग्रेस

दरम्यान, पंतप्रधानांच्या वायनाड दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडला भेट दिली, ही चांगली गोष्ट आहे. अपेक्षा आहे की, ते आता मणिपूरलाही भेट देतील.’

१९० फूट लांब ब्रिजची पाहणी

तत्पूर्वी सकाळी ११ वाजता मोदी यांचे एअर इंडिया वन विमानाने कन्नूरला आगमन झाले. तेथून ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे वायनाडला पोहोचले. वायनाडला जात असताना त्यांनी भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या चुरालमाला, मुंदाक्काई आणि पुंचिरिमत्तम या गावांची हवाई पाहणी केली. 

कालपेट्टा येथील हायस्कूलच्या मैदानात त्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तेथून ते चुरालमाला येथे पोहोचले. तेथे लष्कराने मदतकार्यासाठी उभारलेल्या १९० फूट लांब बेली ब्रिजची त्यांनी पाहणी केली. चुरालमाला गावात जाऊन त्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. ३० जुलै रोजी येथे भूस्खलन झाले होते.

ही दुर्घटना घडली तेव्हापासून मी इथल्या संपर्कात असून सातत्याने माहिती घेत आहे. भूस्खलन पीडितांना किती भीषण संकटाचा सामना करावा लागला, हे मी पीडितांच्या तोंडून ऐकले आहे. निसर्गाचे रौद्ररूप भूस्खलनाच्या निमित्ताने दिसून आले.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :landslidesभूस्खलनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी