शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार कोटींच्या रोजगार योजनेचा उद्या प्रारंभ; सहा राज्ये लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:05 IST

११६ जिल्ह्यांत स्थलांतरित कामगारांना मिळेल काम

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर विविध राज्यांतून आपापल्या घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून पंतप्रधान मोदी हे शनिवारी ५० हजार कोटी रुपयांची रोजगार योजना सुरू करणार आहेत.या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ असे असून, ती प्रामुख्याने प्रारंभी सहा राज्यांत राबवली जाईल. या सहा राज्यांत बहुतांश स्थलांतरित कामगार परतले आहेत. या योजनेतून ग्रामीण भागांत फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामे केली जातील. त्यातून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत येथे सांगितले. मोदी या योजनेचा प्रारंभ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यातील तेलिहार खेड्यात त्याची सुरुवात होईल. या योजनेत पश्चिम बंगालचा समावेश का नाही, असे विचारले असता ग्रामीण विकास सचिव एन.एन. सिन्हा म्हणाले, जेव्हा हा कार्यक्रम बनवण्यात आला तेव्हा प. बंगालने त्यांच्याकडे किती स्थलांतरित कामगार आले याची माहितीच दिली नव्हती. २५ हजार स्थलांतरित कामगार असलेला कोणताही जिल्हा या योजनेत सहभागी होऊ शकतो. जर आमच्याकडे पुरेशी संख्या आली, तर आम्ही त्यांचा त्यात समावेश करू, असेही ते म्हणाले.बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, ओदिशाचा समावेशबिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा राज्यांतील (प्रत्येकी २५ हजार स्थलांतरित कामगार) ११६ जिल्ह्यांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे, असे सीतारामन म्हणाल्या. या जिल्ह्यांत एकूण स्थलांतरित कामगारांपैकी दोनतृतीयांश कामगार आहेत.या योजनेतून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची २५ कामे केली जातील. रोजगार देण्यासह ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचाही उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या