शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मोदींनी गमछातून दिला खास संदेश; तुम्हाला समजला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 13:56 IST

coronavirus कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मोदींचा खास संदेश

नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील असं पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित करताना जाहीर केलं. मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना सुरुवातीला तोंडाला गमछा बांधला होता. मात्र थोड्याच वेळात त्यांनी तो बाजूला केला. कोरोनाला रोखण्यासाठी घरातील गमछा, रुमाल यांचा मास्कसारखा वापर करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला. मोदींनी ११ एप्रिलला देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळीही त्यांना घरातच तयार करण्यात आलेला मास्क वापरला होता. देशातल्या जनतेनं घरातच मास्क तयार करून त्याचा वापर करावा, हा संदेश देण्यासाठी मोदी वारंवार घरातच तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करतात. गमछा, रुमाल, ओढणीचा वापर मास्क म्हणून करता येऊ शकतो, हा संदेश देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे.सध्या देशात मास्क आणि सॅनिटायझर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मोदी घरातच तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करण्याचं आवाहन करत आहेत. मास्क मिळत नसल्यानं काही जण मास्क न लावताच घराबाहेर पडतात. अशा व्यक्तींनी घरातील वस्तूंचा वापर करून मास्क तयार करावा, असं मोदींनी त्यांच्या कृतीतून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी