शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan 2: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, पीएम मोदींची भेट इस्रोसाठी अशुभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 12:36 IST

पंतप्रधान मोदींनी इस्रो कार्यालयाला दिलेल्या भेटीवर टीका

बंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइस्रोच्या बंगळुरुतील कार्यालयाला दिलेली भेट अपशकुन ठरल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी म्हटलं आहे. मोदी अशाप्रकारे बंगळुरुत आले होते, जसं काय तेच चांद्रयानाचं लँडिंग करुन संदेश पाठवणार होते, अशा शब्दांमध्ये कुमारस्वामींनी मोदींवर टीका केली. गेल्या आठवड्यात विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. यावेळी पंतप्रधान मोदी इस्रोच्या बंगळुरुमधील कार्यालयात उपस्थित होते. मोदींच्या इस्रो कार्यालयातील उपस्थितीवर कुमारस्वामींनी निशाणा साधला. 'मोदी बंगळुरुत अशा थाटात आले होते, जणू काही तेच चांद्रयान-२ उडवत आहेत. कदाचित मोदींनी इस्रोच्या कार्यालयाला दिलेली भेट तिथल्या शास्त्रज्ञांसाठी अशुभ ठरली,' असं कुमारस्वामींनी म्हटलं. इस्रोनं चांद्रयान-२ मोहिमेसाठी १० वर्षे मेहनत घेतली. २००८ मध्येच या मोहिमेला मंजुरी मिळाली होती, असंदेखील ते पुढे म्हणाले. चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क गेल्या आठवड्यात तुटला. त्यावेळी विक्रम चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर होतं. यानंतर इस्रोच्या ऑर्बिटरनं विक्रमचा फोटो टिपला. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सिवन यांनी दिली. इस्रोसोबतच नासादेखील विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीK. Sivanके. सिवनisroइस्रोkumarswamyकुमारस्वामी