शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Brunei Visit: ब्रुनेईला पोहोचून पंतप्रधान मोदी रचणार इतिहास, असा आहे त्यांचा संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 14:00 IST

PM Narendra Modi Brunei Visit:  ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची...

पंतप्रधाननरेंद्र मोदी आज ब्रुनेई दौऱ्यावर आहेत. सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून ते ब्रुनेई दारुस्सलाम येथे जात आहेत. महत्वाचे म्हणजे, ब्रुनेई द्विपक्षीय दौऱ्यावर जाणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील. ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची. कारण येथे अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 

पंतप्रदान मोदींचा संपूर्ण स्केड्यूल -- 3 सप्टेंबरला स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी ब्रुनेई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तेथे त्यांचे औपचारीक स्वागत केले जाईल.- सायंकाली 5:30 वाजता ते ठरलेल्या हॉटेलवर पोहोचतील. तेथे त्यांचे सामुदायिक स्वागत केले जाईल.- सायंकाळी 7:50 वाजता भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सरीचे उद्घाटन करतील. - रात्री 08:15 वाजता पीएम मोदी  उमर अली सैफुद्दीन मशिदीचा दौरा करतील.

या मुद्द्यांवर होणार चर्चा - परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पंतप्रधान मोदींच्या ब्रुनेई दौऱ्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यातील अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामुळेच त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

सेमीकंडक्टर सहकार्य - पंतप्रधान मोदी तेथील सुल्तानांसोबत बोलताना सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या  शक्यतेवर चर्चा करतील.

द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक - भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात 270 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. द्विपक्षीय चर्चेत, पंतप्रधान नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीसंदर्भात तेथील सुलतानांसोबत चर्चा करतील.

हायड्रोकार्बन आणि नैसर्गिक वायूची आयात -भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करतो. सध्या भारत नैसर्गिक वायूची आयात वाढविण्यावर भर देत आहे. अशात पंतप्रधान मोदी या विषयावरही विशेष चर्चा करू शकतात, असे मानले जात आहे.

म्यानमारच्या परिस्थितीवर चर्चा - पीएम मोदी सुल्तान हसनल बोल्किया यांच्यासोबत म्यानमारच्या स्थितीवरही चर्चा करू शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान