शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2018 10:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत

जांगला (बिजापूर, छत्तीसगड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी मे 2015 मध्ये त्यांनी दंतेवाडाला भेट दिली होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भाजपाच्या ट्विटर पेजलाही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

बिजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर  मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात आल्या. या प्रकारच्या योजनेंत तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात येणार आहेत, यामुळे जंगलात त्या आरामात चालू शकतील.  

 

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आयुष्यमान भारत योजनेच्या पहिल्या आरोग्य केंद्राचे जांगला येथे उद्घाटन केले. इतरही अनेक विकास कामांचे उद्घाटन, या वेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

अन्य कामांचीही सुरुवातबस्तर इंटरनेट योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही मोदी त्यांच्या हस्ते झाले. त्याद्वारे आदिवासीबहुल सात जिल्ह्यांत ४० हजार किमी फायबर आॅप्टिकल केबल टाकून इंटरनेट जाळे निर्माण करण्यात येणार आहे. बिजापूर, नारायणपूर, बस्तर, कांकेर, कोंडगाव, सुकमा आणि दंतेवाडा यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी रेल्वे मार्ग आणि गुडुम व भानुप्रतापपूर या दरम्यान धावणाºया रेल्वेचे उद्घाटनही केले. यामुळे बस्तर विभाग रेल्वेच्या नकाशावर आला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी