शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मुलं अधिक जबाबदारीनं वागली, तरच मुलींना सुरक्षित वाटेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 20:15 IST

कथुआ, उन्नव बलात्कार प्रकरणावर मोदींचं भाष्य

मध्य प्रदेश: कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारनं अध्यादेश आणून 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी मुलांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज व्यक्त केली. 'लोकांनी त्यांच्या मुलींना सन्मान द्यायला हवा आणि मुलींना सुरक्षित वातावरण पुरवण्यासाठी मुलांना त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करुन द्यायला हवी,' असं मोदींनी मध्यप्रदेशातील मांडला येथे बोलताना म्हटलं. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी सामाजिक आंदोलन छेडण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मांडला येथे आयोजित रॅलीत पंतप्रधान मोदींआधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारनं शनिवारी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख केला. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला थेट फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय शनिवारी मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतला. याबद्दल बोलताना, दिल्लीतील सरकार जनभावना लक्षात घेऊनच निर्णय घेत असल्याचं मोदींनी म्हटलं. लोकांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचंही मोदी म्हणाले. कथुआ आणि उन्नव प्रकरणानंतर भाजपवर टीकेची झोड उठली होती. उन्नवमधील बलात्कार प्रकरणात भाजपच्या आमदाराला अटक झाली आहे. तर कथुआमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीसाठी भाजपचे आमदार रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे जनभावना अतिशय तीव्र झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत पॉक्सो कायद्यात बदल केला. याआधी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात होती. त्यात मोदी सरकारनं बदल करत अशा प्रकारचं संतापजनक कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Rapeबलात्कारNarendra Modiनरेंद्र मोदीKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण