शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

By जयदीप दाभोळकर | Updated: February 1, 2021 11:25 IST

Budget 2021 : लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारकडून २७.१ कोटींची मदत, जी जीडीपीच्या १३ टक्के - अर्थमंत्री

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या कालावधीत सरकारकडून २७.१ कोटींची मदत, जी जीडीपीच्या १३ टक्के - अर्थमंत्रीपंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा ८० कोटी लोकांना फायदा

२०२१ या वर्षांचं देशाा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात करण्यात आली असून याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी दिली. "तीन आठवड्यांच्या पूर्ण लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली. याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाला. आठ कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर मिळालं. या कालावधीत मोठ्या संख्येत लोकं आपापल्या घरात होती. असं असलं तर आरोग्य सेवक, बँक कर्मचारी, वीज कर्मचारी, आपले अन्नदाते आणि जवान कार्यरत होते," असं सीतारामन म्हणाल्या."या कालावधीत सदनातील सर्व सदस्यांनी ज्याप्रकारे साथ दिली त्यांचे मी आभार मानते. विधानसभा सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यांनी आपलं वेतनही या महासाथीदरम्यान दिलं. या कालावधीत सरकारनं आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केलं. यावेळी सरकारनं एकूण २७.१ लाख कोटी रूपये दिली जे देशाच्या जीडीपीच्या १३ टक्के आहेत," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.ज्या प्रकारे यावेळी अर्थसंकल्प तयार केला तसा यापूर्वी कधीही करण्यात आला नाही. हे एक आव्हान होतं. गेल्या वेळी जेव्हा आम्ही अर्थसंकल्प सादर केला तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोणत्या दिशेला जाणार हे आम्हाला माहित नव्हतं. कोणालाच ही कल्पनादेखील नव्हती की आपण एका मोठ्या महासाथीच्या दिशेने जात आहोत, असंही सीतारामन यांनी नमूद केलं. आपल्याकडे आज दोन लसी उपलब्ध आहेत. १०० पेक्षा जास्त देशांना त्याचा फायदा मिळत आहे. अजून दोन लसी लवकरच येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैज्ञानिकांना धन्यवाद दिले. २०२१ मध्येही आपलं ये युद्ध सुरूच आहे. जागतिक युद्धानंतर जसे बदल घडले तसे कोरोनाच्या युद्धानंतर रणनितीक संबंधांमध्ये बदल होती. भारत लँड ऑफ होपकडे पाहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी