शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi : ६४ हजार कोटींच्या आयुषमान भारत  योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, उत्तर प्रदेशात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचेही उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 05:44 IST

PM Narendra Modi : उत्तर प्रदेशातील वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे, तसेच त्या राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले. 

नवी दिल्ली : आयुषमान भारत आरोग्य सुविधा योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ झाला. या योजनेसाठी केंद्र सरकार ६४ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे, तसेच त्या राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले. उत्तर प्रदेशमध्ये आधीच्या सरकारांनी आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी फारशी हालचाल केली नाही, अशी टीकाही पंतप्रधानांनी यावेळी केली.२३२९ कोटी रुपये खर्चून उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर, इटाह, हरदोई, प्रतापगढ, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर, जौनपूर या जिल्ह्यांमध्ये नऊ नवी वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात आली आहेत. 

आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भरपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आरोग्य योजना राबविताना खूप घोटाळे करणे, त्यातून खूप पैसे कमावणे हे उद्योग उत्तर प्रदेशमध्ये याआधीच्या सरकारांनी केले होते. मात्र, आमच्या सरकारच्या काळात जनतेच्या पैशाचा उपयोग उत्तम योजनांच्या अंमलबजावणीसाठीच केला जातो. देशातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यामुळे भविष्यात आणखी कोणत्याही साथी आल्या तरी त्यांचा नीट मुकाबला करता येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारत