शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: संकटातही राजकारण? पीएम केअरला केलेली मदतच सीएसआरमध्ये ग्राह्य; सीएम रीलिफ फंड वगळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 11:37 IST

coronavirsu: सीएसआरच्या बाबतीत मोदी सरकारचं स्पष्टीकरण

मुंबई: पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांना त्यांच्या एकूण लाभापैकी किमान २ टक्के रक्कम सीएसआरच्या अंतर्गत सामाजिक कार्यासाठी दान करावी लागते. सध्या देशासमोर कोरोनाचं संकट असल्यानं अनेक कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचं दान केलं आहे. मात्र या प्रकरणी केंद्रानं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान सहाय्यता निधी किंवा पीएम केअर्सला केलेली मदतच सीएसआरमध्ये मोजण्यात येईल. कॉर्पोरेट कंपन्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलेली मदत सीएसआरमध्ये मोजली जाणार नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलेली मदत सीएसआर म्हणून ग्राह्य धरली जाणार नसली, तरी राज्य आपत्ती व्यवस्थापनाला केलेली मदत सीएसआरमध्ये मोजली जाईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी थेट राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. तर राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीवर केंद्राचं नियंत्रण असतं. त्यामुळेच केंद्रानं हा निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जातं. राज्य आपत्ती व्यवस्थापना निधीत जमा होणाऱ्या रकमेचं वाटप केंद्राकडून केलं जातं. केंद्राच्या या स्पष्टीकरणानंतर राज्य सरकारांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तमिळनाडू सरकारनं मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा करण्यात आलेली रक्कम तातडीनं राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत वळती केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या