शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ममतांना ठार मारण्याचाच कट होता, तृणमूलचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:43 IST

तृणमूलचा आरोप; भाजप, काँग्रेसला हल्ल्याविषयीच शंका

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वीकारली पाहिजे. त्यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप गुरुवारी तृणमूल काँग्रेसने गुरूवारी केला. निवडणूक काळात राज्यातील कायदा-व्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दुसºया राज्यांतून समाजकंटक नंदीग्रामला आणून हिंसाचार घडविण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे असेही तृणमूलच्या नेत्यांनी बोलून दाखविले.या हल्ल्याप्रकरणी तृणमूल व भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांची भेट घेतली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली.   मात्र ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करतानाच प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मते मिळवण्यासाठी ममतांनी हे नाटक केले नाही ना, हे तपासायला हवे. त्यांची अशी नाटके जनतेने याआधी पाहिली आहेत. भाजपचे दोन नेते त्यांच्या या विधानानंतर  ममता बॅनर्जी यांची विचारपूस करायला रुग्णालयातही गेले. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही काल रुग्णालयात जाऊ न प्रकृतीची चौकशी केली.

हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी बॅनर्जी यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणी नंदीग्राम जिल्हाधिकारी विभू गोयल, पोलीस अधीक्षक प्रवीण प्रकाश व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी भेट दिली. या घटनेच्या साक्षीदारांकडून या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आणि हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले.

पटनायक यांना चिंताया हल्ल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चिंता व्यक्त केली आहे. ममता यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१