शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

पुरणचंद्र मेश्रामांची हायकोर्टात याचिका

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांचा कार्यकाळ संपला असून याच पदावर पुन्हा ५ वर्षांसाठी पुनर्नियुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे. परंतु, १२ ऑक्टोबर २०१४ रोजी कुलपतींनी त्यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी गुरुवारी कुलपती व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

२९ मे २०१९ पर्यंत नियुक्ती कायम ठेवावी, अशी मेश्राम यांची विनंती आहे. ६ डिसेंबर २०१४ रोजी वित्त व लेखाधिकारीपदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तत्कालीन प्रभारी कुलगुरूंनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी कुलपतींना लिहिलेल्या पत्रातील आरोप काल्पनिक आहेत. व्यवस्थापन परिषदेने ७ जुलै २०१४ रोजी आपली पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे, असे मेश्राम यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. बी. जी. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.