शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:02 IST

अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील अन्नात कीडा सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

भारतीय रेल्वेची शान समजल्या जाणाऱ्या आणि हायस्पीड प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील अन्नात कीडा सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयआरसीटीसीने संबंधित केटरिंग कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गाडी क्रमांक २२९६२ अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दुपारचे जेवण देण्यात आले होते. यावेळी आदित्य डिडवानिया नावाच्या प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या कोचमधील किमान दोन प्रवाशांच्या जेवणात मेलेले कीडे आढळले. हा प्रकार पाहताच डब्यातील इतर प्रवाशांनीही जेवण थांबवले आणि एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी या निकृष्ट अन्नाचा व्हिडिओ आणि फोटो काढून रेल्वे मंत्रालयाला टॅग केले.

बड्या कंत्राटदाराला दणका

या रेल्वेचे केटरिंग कंत्राट 'मेसर्स वृंदावन फूड प्रॉडक्ट्स' या कंपनीकडे आहे, जी रेल्वे क्षेत्रातील मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या आर. के. अग्रवाल ग्रुपचा भाग आहे. प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आयआरसीटीसीने तातडीने सूत्रे हलवली. केवळ दंडच नाही, तर या कंत्राटदाराला 'टर्मिनेशन नोटीस' बजावण्यात आली आहे. तसेच ज्या बेस किचनमधून हे जेवण आले होते, ते सील करून तिथे पेस्ट कंट्रोल आणि सखोल स्वच्छतेचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यातही घडला होता असाच प्रकार

वंदे भारतमधील अन्नाच्या दर्जाबाबतची ही पहिलीच घटना नाही. अवघ्या महिनाभरापूर्वी १५ मार्च २०२६ रोजी पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही अन्नात कीडा सापडला होता. त्यावेळी रेल्वेने कडक पावले उचलत संबंधित सेवा पुरवठादारावर ५० लाख रुपयांचा दंड आकारून त्याचे कंत्राट कायमचे रद्द केले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Passengers' Food Safety Concerns: Worms Found, Contractor Penalized.

Web Summary : Worms were found in food served on the Ahmedabad-Mumbai Vande Bharat Express, sparking passenger outrage. IRCTC fined the catering contractor ₹10 lakh and initiated contract termination. This follows a similar incident last month, raising concerns about food quality and passenger safety on the high-speed train.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसfoodअन्न