नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक प्रकृती सुधारण्यासाठी कठोर आर्थिक उपायांचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे देत असतानाच ‘जेनेरिक’ स्वरूपातील 5क् आवश्यक औषधे सर्वाना मोफत उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांचे जिणो सुखकर करण्याच्या गोड गोळीची योजनाही सरकार आखत आहे.
नागरिकांना जन्मापासून मृत्यूर्पयत सर्वसामान्यपणो लागणारी 5क् आवश्यक औषधे सर्वाना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे. या 5क् औषधांच्या उपलब्धतेने देशातील बहुसंख्य नागरिकांच्या 75 टक्के आरोग्यविषयक गरजा भागविल्या जाऊ शकतील, असे केंद्रीय सार्वजनिकआरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
ते म्हणाले की, विविध प्रकारची वेदना, जंतुसंसर्ग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आरोग्यविषयक तक्रारींवर सर्वसामान्यपणो वापरली जाणारी अशी ही 5क् औषधे असतील. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रीस्क्रिप्शनवर ही औषधे सरकारी इस्पितळे व दवाखान्यांमधून नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल.
अंतिमत: देशातील सर्व नागरिकांर्पयत पोहोचणो हा या योजनेचा उद्देश असेल. सुरुवातीस निवडक इस्पितळांमध्ये सुरुवात करून टप्प्याटप्प्याने देशभर या योजनेचा विस्तार केला जाईल, असेही सांगितले गेले.
आरोग्यमंत्री म्हणाले की, या योजनेतून द्यायच्या प्रमाणित औषधांची सूची केल्याने सरकार, बहुसंख्य जनतेच्या गरजा भागविण्यासाठी, अधिक दज्रेदार अशी 35 टक्के जास्त औषधे खरेदी करू शकेल.सध्या सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये वापरल्या जाणा:या औषधांपैकी 5क् टक्के औषधे वाया जातात किंवा प्रमाणाबाहेर वापर केल्याने त्यांचा गुण येत नाही. त्यामुळे या योजनेत औषधांची खरेदी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणो, त्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणो व त्यांचा रास्त वापर करणो यावर या योजनेत विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)