शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

नियोजन आयोग इतिहासजमा !

By admin | Updated: December 8, 2014 03:17 IST

तब्बल ६४ वर्षांपूर्वीचा नियोजन आयोग गुंडाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्गठित राष्ट्रीय योजना आणि सुधारणा आयोगात (एनपीआरसी) राज्यांच्या सक्रिय सहभागाचे गाजर दाखविले आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीतब्बल ६४ वर्षांपूर्वीचा नियोजन आयोग गुंडाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्गठित राष्ट्रीय योजना आणि सुधारणा आयोगात (एनपीआरसी) राज्यांच्या सक्रिय सहभागाचे गाजर दाखविले आहे. स्व. पं. जवाहरलाल नेहरूंच्या कल्पनेतून साकारलेला हा आयोग गुंडाळू नये, असे काँग्रेस आणि समविचारी पक्षांना वाटत असले, तरी रविवारी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या बैठकीत बहुतांश मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या पुनर्गठनाच्या कल्पनेला समर्थन दिले. त्यामुळे हा आयोग इतिहासजमा झाल्याची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. योजना आयोगाचे नाव काय राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विविध पोर्टल्सच्या माध्यमातून लाखो सूचना आणि शिफारशी मिळाल्या, असे संकेत पंतप्रधानांनी दिले असले तरी कोणतीही घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेले नाव पाहता रालोआला काय हवे, त्याचे संकेत मिळतात. १९५० मध्ये पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी निर्माण केलेली ही संस्था गुंडाळली जावी, असे काँग्रेस आणि समविचारी पक्षांना वाटत नाही. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेतून तेच दिसून आले. तामिळनाडू (अण्णा द्रमुक), ओडिशा (बिजद), तेलंगणा (टीआरएस) आणि ईशान्येकडील काही बिगर रालोआ सरकार असलेल्या राज्यांनी एकप्रकारे समर्थन देत मोदींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. मोदींनी परिषद संपताच आयोगासंबंधी बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. आपल्या सात रेसकोर्स निवासस्थानी २९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दिवसभर चर्चा करताना मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणि विकासासाठी सुधारित नवे मंडळ ‘टीम इंडिया’प्रमाणे कसे काम करील, याचे उत्साहात विवेचन केले. योजना आयोगाची पुनर्रचना करताना मोदींनी सांघिकतेवर भर दिला आहे. जुन्या योजना आयोगाच्या संकल्पनेत ही केंद्र सरकारची संस्था असून, त्यात राज्यांच्या भूमिकेला वाव नाही. या आयोगाच्या प्रस्तावांना तसेच पंचवार्षिक योजनेला मंत्रिमंडळ तसेच राष्ट्रीय विकास परिषदेच्या मान्यतेची गरज होती. मोदींनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या सुधारणा काळाबाबत आयोगाकडे भविष्याचा दृष्टिकोन नाही, या डॉ. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेचे स्मरण देत मोदी म्हणाले, की डॉ. सिंग यांनाही आयोगाची पुनर्रचना केली जावी असे वाटत होते.