शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' ठिकाणी 50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 19:22 IST

येथील एका हॉटेलमध्ये सर्वात मोठा पराठा मिळतो. त्या पराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आहे आणि एक किलो वजन आहे. 

ठळक मुद्दे50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफतपराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आणि एक किलो वजनपराठे बनविण्यासाठी तुपाचा वापर

नवी दिल्ली : भारतात असा कोण नसेल की त्याला पराठे आवडणार नाहीत. सकाळच्या नाश्ताची सुरुवातच काहींची पराठे खाऊन होते. पराठा असा खाद्यपदार्थ आहे की, सकाळच्या नाश्तापासून ते रात्रीपर्यंत केव्हाही खाल्ला जाऊ शकतो. त्यामुळे भुकेची काळजी मिटते. पराठ्याचे नाव जरी काढले, तर अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. पराठ्याचे अनेक प्रकार आहेत. दरम्यान, येथील एका हॉटेलमध्ये सर्वात मोठा पराठा मिळतो. त्या पराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आहे आणि एक किलो वजन आहे. 

50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफतदिल्ली-रोहतक बायपासजवळ एक हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव तपस्या पराठा जंक्शन असे आहे. या हॉटेलमध्ये रोज हजारो लोक नाश्ता करण्यासाठी येतात. विशेष म्हणजे, 50 मिनिटांत 3 पराठे तुम्ही येथील हॉटेलमध्ये खाल्ले, तर तुम्हाला आयुष्यभर पराठे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे अनेक पराठाप्रेमी हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी इकडे धाव घेतात. मात्र एक पराठा खाल्यानंतर हार मानतात. दरम्यान, या हॉटेलची चर्चा सोशल मिडीयात होत आहे.  

पराठे बनविण्यासाठी तुपाचा वापरया हॉटेलमध्ये पराठे बनविण्यासाठी तेलाचा वापर करण्यात येत नाही, तर तुपाचा वापर केला जातो. या हॉटेलला जवळपास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकारचे पराठे मिळतात. पनीर, स्वीट, छोला, मटर, पालक अशा प्रकारचे अनेक प्रसिद्ध पराठे आहेत. 

टॅग्स :foodअन्न