शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्याने जोडले तीर्थयात्रेचे पुण्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:38 IST

तीर्थयात्रेला जाऊन फक्त माणूसच गाठीशी पुण्य जोडतो, असे नाही. कदाचित, ती आस प्राण्यांनाही असावी. असाच विरळा अनुभव अलीकडेच शबरीमलाची यात्रा केलेल्या भाविकांच्या एका तुकडीला आला

बंगळुरू : तीर्थयात्रेला जाऊन फक्त माणूसच गाठीशी पुण्य जोडतो, असे नाही. कदाचित, ती आस प्राण्यांनाही असावी. असाच विरळा अनुभव अलीकडेच शबरीमलाची यात्रा केलेल्या भाविकांच्या एका तुकडीला आला. या भाविकांसोबत गेलेल्या रस्त्यातील एका भटक्या कुत्र्यानेही जातानाची सुमारे ५०० किमीची पदयात्रा केली व येताना तो सोबतच रेल्वेने परत आला. या कुत्र्याच्या अजोड कृतीने भाविक भारावले.गेल्या १७ डिसेंबरला हलसुरु येथील १६ भाविक पदयात्रा करत शबरीमलाला निघाले. हे भाविक होसूरमार्गे पुढे जात असताना, त्या गटातील सी. मदनकुमार यांच्यासोबत एक कुत्राही चालू लागला. तो कुत्रा व मदनकुमार यांची गट्टीच जमली. हळूहळू तो कुत्रा या साºयाच भाविकांचा लाडका झाला. ‘भैरव’ नावाने ते त्याला हाक मारू लागले. पदयात्रा पुढे जात होती. २७ डिसेंबरचा तो दुर्दैवी दिवस उजाडला. दिंडिगल जिल्ह्यातील सेमबत्ती येथे ही पदयात्रा आली असता, एका भरधाव कारने सी. मदनकुमार यांना धडक दिली. भाविकांच्या गटातील काही जण गंभीर जखमी झालेल्या मदनकुमार यांना प्रथम दिंडिगल व नंतर मदुराई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत गेले. मात्र, सी. मदनकुमार यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या गटातील जे इतर भाविक सेमबत्ती येथे थांबले होते, त्यांच्यासोबत भैरव हा कुत्राही होताच. एका क्षणी या मुक्या प्राण्याला काय वाटले माहीत नाही, पण त्याने या भाविकांची साथ सोडली. दुसºया भाविकांचा एक गट शबरीमलाला पदयात्रा करत निघाला होता. सोबत भैरवही निघाला. दरम्यान, सेमबत्ती येथे जो भाविकांचा गट काही काळ थांबला. तोही काही दिवसांनी शबरीमलाला पोहोचला. तिथे जाऊन पाहतात तो काय, साक्षात भैरव कुत्रा त्यांच्या समोर दत्त म्हणून हजर!दर्शन घेऊन परतताना आता या ‘भैरव’चे करायचे काय, असा प्रश्न या भाविकांना पडला. त्याला येथेच सोडून जा, असे पुजारी मंडळींनी सुचविले. त्याप्रमाणे त्याला मंदिराच्या आवारात सोडून हे भाविक पम्पा बस स्टँडवर गेले, तर भैरव त्यांच्या आधी तेथे जाऊन उभा होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :dogकुत्रा