शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चुटकीसरशी निवडा वाहिन्यांचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 05:27 IST

ट्रायची वेबसाइट ठरतेय ग्राहकांना मार्गदर्शक

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीबाबत साशंकता असल्याने विविध वाहिन्यांचे नेमके दर किती आहेत व नेमक्या कोणत्या वाहिन्यांची निवड करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ट्रायने सुरू केलेली वेबसाइट ग्राहकांना उपयुक्त ठरत आहे.वाहिन्यांची निवड करून शुल्क तपासण्यासाठी https://channel.trai.gov.in या वेबसाइटवर ग्राहकांना आपली नोंदणी करावी लागेल. त्यानंतर राज्य व कोणत्या भाषेतील वाहिन्या पाहायच्या आहेत त्याची नोंद करावी लागेल. त्यानंतर बातम्या, संगीत, क्रीडा, लाइफस्टाईल, धार्मिक, माहिती वाहिन्या, चित्रपट, लहान मुलांच्या वाहिन्या अशा पर्यायांपैकी आपल्याला हवा असलेला पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर किमतीनुसार ५ रुपयांखालील, १० रुपयांखालील व १९ रुपयांखालील अशा वाहिन्यांची निवड करता येते. त्याशिवाय, ब्रॉडकास्टर्स कंपनीप्रमाणे, भाषेप्रमाणे, एसडी-एचडीप्रमाणे निवड करता येते. यानंतर नेमक्या कोणत्या वाहिन्या पाहायच्या त्यावर क्लिक करता येते. त्यासमोर त्यांची किंमत दिलेली आहे. सर्व निवड करून झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या वाहिन्यांची संख्या व त्यासाठी द्यावी लागणारी किंमत ही माहिती ‘सिलेक्शन’मध्ये पाहता येते. तेथे गेल्यानंतर एकूण वाहिन्या, नि:शुल्क वाहिन्या, सशुल्क वाहिन्यांची संख्या, त्यांची किंमत, १८ टक्के जीएसटीप्रमाणे होणारी किंमत या सर्वांची एकूण रक्कम दाखवली जाते. ही माहिती डाऊनलोड करण्याची व प्रिंट काढण्याची सुविधादेखील यामध्ये देण्यात आली आहे.https://channeltariff.trai.gov.in या वेबसाइटवर विविध वाहिन्यांच्या समूहाची किंमत व त्यामध्ये समावेश असलेल्या वाहिन्यांची नावे, विविध सशुल्क वाहिन्यांची कमाल किंमत, नि:शुल्क वाहिन्यांची किंमत, ट्रायने सुचवलेल्या समूह वाहिन्यांची यादी अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे.केबलची दरवाढयामधून मध्यममार्ग काढत काही केबल चालकांनी सरासरी १०० रुपये वाढ केली असून ग्राहकांनीदेखील त्याला मान्यता दिली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एका केबल चालकाने ग्राहकांशी संवाद साधत त्यांना १०० रुपये वाढ केलेले दर देण्यास भाग पाडले आहे. ग्राहकांनीदेखील कोणती वाहिनी पाहायची, किती दर द्यायचा याबाबत केबल चालकाला सातत्याने संपर्क साधावा लागणार असल्याने व नवीन वाहिनी पाहण्यासाठी ग्राहकाला नव्याने अर्ज द्यावा लागणार असल्याने कोणतीही क्लिष्टता नको म्हणून सरसकट १०० रुपये वाढ देण्यास होकार दिला आहे. ग्राहकांनीदेखील नियमावलीत अडकण्यापेक्षा सरसकट १०० रुपये वाढ देण्यास सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे ट्रायच्या नियमावलीमुळे केबलचे दर कमी होण्याऐवजी वाढले आले आहेत.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय