शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती हा गुन्हा ठरवू नये, केंद्र सरकारची हायकोर्टात भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:44 IST

पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती (मॅरिटल रेप) गुन्हा ठरविल्यास विवाहसंस्थेला तडा जाईल, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली आहे.

नवी दिल्ली : पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती (मॅरिटल रेप) गुन्हा ठरविल्यास विवाहसंस्थेला तडा जाईल, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली आहे. अशी कृती गुन्हा ठरविल्यास महिलांना पुरुषांना अडचणीत आणण्यासाठी हे एक हत्यार मिळेल, असेही सरकारने न्यायालयात म्हटले आहे.सरकारच्या वतीने अ‍ॅड. मोनिका अरोरा यांनी खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात म्हटले आहे की, जर पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती कायदेशीर गुन्हा ठरविली, तर ते महिलांसाठी हत्यार बनेल. त्यातून अनेक पुरुषांवर हकनाक आरोप लावले जातील. एखादी व्यक्ती आणि त्याची पत्नी यांच्यातील लैंगिक संबंधांचा कोणताही पुरावा उपलब्ध नसतो. त्यामुळे तो गुन्हा सिद्ध करणेही अवघड आहे. असे झालेच तर विवाहसंस्थाच खिळखिळी होईल.- पत्नीवरील शारीरिक जबरदस्ती हा कायदेशीर गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्याची मागणी करणारी याचिका रिट फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्या. सी. हरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे.पाश्चिमात्य कायद्याचे अंधानुकरण करणे गरजेचे नाहीकेंद्र सरकारने म्हटले की, कोणत्याही कायद्यात लग्नानंतरच्या पत्नीसोबत केलेल्या शारीरिक जबरदस्तीची व्याख्या करण्यात आलेली नाही. काही पाश्चिमात्य देशांमध्ये असलेल्या अशा कायद्याचे अंधानुकरण आपण करावे, हे गरजेचे आहे, असे नाही.पत्नीसोबतची शारीरिक जबरदस्ती हा गुन्हा ठरवला जाऊ नये, अशा आपल्या म्हणण्याला सरकारने काही कारणेही दिली आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार भारतात महिलांचा शैक्षणिक स्तर कमी आहे.भारतात बहुतेक महिला आर्थिकरीत्या आत्मनिर्भर नाहीत. समाजाची तशी मानसिकताही नाही. तसेच प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे अशा कृतीला कायद्याच्या चौकटीत आणले जाऊ शकत नाही, अशी आमची भूमिका असल्याचे सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय