शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्यार तूने क्या किया! भाच्याच्या प्रेमात पडली आत्या; पळून जाऊन केलं लग्न; कुटुंब संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:38 IST

प्रेमात पडलेल्या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. या लग्नामुळे कुटुंबीय प्रचंड संतापले आहेत.

बिहारच्या बांकामध्ये अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. प्रेमात पडलेल्या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. या लग्नामुळे कुटुंबीय प्रचंड संतापले आहेत. कारण लग्न करणारे दोघं नात्याने एकमेकांचे आत्या-भाचा लागतात. आत्या भाच्याच्या प्रेमात वेडी झाल्यानंतर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बांका येथून पळून कोलकाता येथे गेले होते.

प्रेमी युगुलाने घरातून पळून जाऊन कोलकात्याच्या कालीघाट येथे लग्न केल्याचं समोर आलं आहे. या दोघांमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घरातील सदस्य लग्नासाठी तयार न झाल्याने दोघेही घरातून पळून गेले. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. परिसरात या घटनेची देखील खूप चर्चा रंगली आहे. 

लग्नाचा फोटो व्हायरल झाल्याने कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी घरातून पळून जाऊन लग्न करणारे हे दोघं नातेवाईक असल्याने कुटुंब या लग्नावर खूश नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. मक्कू यादव (27) याचे लग्न दुवराज यादव यांची 17 वर्षीय मुलगी सोनिया हिच्याशी झाले आहे. 

दोघांमधील प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी परस्पर सामंजस्याने दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते मान्य नव्हते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मक्कू यादव हा कोलकात्यात ड्रायव्हर म्हणून काम करायचा. मुलगी घरातून पळून कोलकात्याला गेली. त्यानंतर लग्न केलं. तर दुसरीकडे गावकऱ्यांनीही या संबंधावर नाराजी व्यक्त करत अशा कृत्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"