शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

हॉस्पिटलच्या परिचारकांमध्ये लालू प्रसाद यादव यांची क्रेझ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 09:36 IST

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना  रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वीही चारा घोटाळ्यासंबंधित तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते.

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना  रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वीही चारा घोटाळ्यासंबंधित तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते. लवकरच न्यायालय लालूंना शिक्षादेखील सुनावणार आहे.  मात्र, लालू यादव यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं रांची येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान, यावेळी हॉस्पिटलमधील परिचारिकांमध्ये लालू प्रसाद यादव यांची भलतीच क्रेझ पाहायला मिळाली.

यावेळी हॉस्पिटलमधील परिचारिकांनी लालूंसोबत फोटो काढले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरलदेखील झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लालू प्रसाद यादव अगदी चिंतामुक्त दिसत आहेत. कार्डिओलोजी विभागातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर तिथल्या परिचारकांना लालूंसोबत फोटो काढण्याचा मोह अनावर झाला.

लालू प्रसाद यादव चौथ्या खटल्यातही दोषी

दरम्यान, लालूंवर झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा चौथा आरोप आहे. त्यावरील सुनावणी ५ मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळं त्यावरील निर्णय रखडला होता. मात्र 19 मार्चच्या सुनावणीत त्यांना दोषी ठरवण्यात आले.  लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढल्याचा आरोप आहे.चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुस-या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

काय आहे चारा घोटाळा?पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाऱ्याच्या पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. 

या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.

सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल