शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फाडला, आमदाराला ९९ रुपये दंड; विद्यापीठात केले होते आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:40 IST

न्यायमूर्ती व्ही. ए. धधल यांनी आमदार पटेल यांना कुलगुरूंच्या दालनात घुसून कामात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले. प

नवसारी : पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याप्रकरणी नवसारी येथील न्यायालयाने वंसदा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला आहे. पटेल यांनी ९९ रूपये न भरल्यास त्यांना ७ दिवस तुरुंगात जावे लागू शकते. १२ मे २०१७ रोजी पटेल यांच्यावर नवसारी कृषी विद्यापीठात झालेल्या आंदोलनादरम्यान कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र फाडल्याचा आरोप होता.

न्यायमूर्ती व्ही. ए. धधल यांनी आमदार पटेल यांना कुलगुरूंच्या दालनात घुसून कामात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले. पटेल यांच्या व्यतिरिक्त इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या भरतीसाठी गैर-वनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना घेण्यास विरोध केला होता. यावेळी कुलगुरूंच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून अधिकाऱ्याला धमकावले आणि पंतप्रधान मोदींचा फोटो फाडण्यात आला होता.

आमदाराचा हेतू चांगला होता, अन्यथा...

न्यायालयाने म्हटले की, या गुन्ह्यात ३ महिन्यांचा तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड आहे; पण आमदार विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याच्या चांगल्या हेतूने विद्यापीठात गेले होते. मात्र, त्यांची पद्धत योग्य नव्हती, त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. दंड ठोठावल्यानंतरच सोडून देणे योग्य ठरेल, जेणेकरून भविष्यात लोक अशा मानसिकतेपासून दूर राहतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात