शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

गुजरात हायकोर्टातील शिपाई पदासाठी पीएचडीधारकांचे अर्ज; डॉक्टर, इंजीनियरदेखील रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 11:16 IST

रोजगाराच्या संधी नसल्यानं उच्चशिक्षण घेऊनही शिपाई होण्याची वेळ

अहमदाबाद: गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षा नुकतीच पार पडली. शिपाई पदासाठी सुरू असलेल्या या भरतीसाठी अनेक उच्चशिक्षितांनी अर्ज केले होते. यामध्ये पीएडीधारकांसह डॉक्टर, बीटेक इंजिनीयर यांच्यासह पदवीधारकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांइतकी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांनीदेखील त्याच न्यायालयात शिपाई म्हणून काम करण्यासाठी अर्ज केले. उच्च न्यायालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला ३० हजार रुपये वेतन मिळतं. सध्या गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या ११४९ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नुकतंच एका परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेला पदवीधारक, डॉक्टर्स, एलएलएम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार होते. या अर्जदारांची संख्या तब्बल १,५९,२७८ इतकी होती. मासिक ३० हजार रुपयांच्या पगारासाठी १९ पीएचडीधारकांनी अर्ज केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिपाई पदासाठी देण्यात आलेल्या परीक्षेत सात डॉक्टर उत्तीर्ण झाले. त्यांनी ही नोकरीदेखील स्वीकारली. उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी एलएलएम पदवी लागते. मात्र एलएलएम पदवी असलेल्या अनेकांनीदेखील शिपायाची नोकरी स्वीकारली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधी नसल्याचं अधोरेखित झालं आहे. शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी घेतलेल्यांची संख्या ४४९५८ इतकी आहे. यापैकी ५४३ जणांची नियुक्ती झाली आहे. तर इंजीनियर असलेल्या ५७२७ पैकी ११९ जणांची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयUnemploymentबेरोजगारी