शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफ’ची पेन्शन लगेचच तिप्पट होणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:55 IST

पेन्शनयोग्य मासिक वेतन १५ हजार रुपये गृहित धरून पेन्शनची सुधारित योजना सप्टेंबर २०१४ पासून लागू केली गेली आहे. त्यानुसार सध्या मिळणारे किमान मासिक पेन्शन २,५०० रुपयांच्या जवळपास आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडन्ट फंड) सदस्यांना निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या किमान मासिक पेन्शनची सध्या असलेली एक हजारांची मर्यादा वाढवून तीन हजार करण्यासंबंधीचा निर्णय यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यावर तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निकाल लागल्यानंतर घेतला जाईल, असे सरकारतर्फे बुधवारी संसदेत सांगण्यात आले.हे पेन्शन किमान तीन हजार रुपये करावे व त्याची महागाई निर्देशांकाशी सांगड घालावी, अशी केंद्रीय कामगार संघटनांची मागणी आहे. याबाबत राज्यसभेत कामगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांच्यावतीने संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन कुमार मेघवाल यांनी ही माहिती दिली. मेघवाल म्हणाले की, याबाबत श्रम मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. समितीचा अहवाल आॅक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. शिवाय याच विषयाशी संबंधित २२ रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. समितीचा अहवाल आल्यावर व न्यायालयाचा निकाल लागल्यावर यावर विचार केला जाईल.वेतनाच्या ५ टक्के सरकारी हिस्सा हवामंत्र्यांनी असेही सांगितले की, पेन्शनयोग्य मासिक वेतन १५ हजार रुपये गृहित धरून पेन्शनची सुधारित योजना सप्टेंबर २०१४ पासून लागू केली गेली आहे. त्यानुसार सध्या मिळणारे किमान मासिक पेन्शन २,५०० रुपयांच्या जवळपास आहे. असे वाढीव पेन्शन देण्यासाठी सरकार ‘पीएफ’ संघटनेस अधिक निधीही देत आहे. सुधारित पेन्शन योजनेचा लाभ सध्या ६२.४२ लाख पेन्शनरना मिळत आहे. सध्या योजनेच्या पेन्शन फंडात सरकार प्रत्येक सदस्यामागे पेन्शनयोग्य वेतनाच्या १.६ टक्के एवढी रक्कम देते. ती वाढवून चार किंवा पाच टक्के करावी, अशीही मागणी आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय