विदेशी फार्मा कंपन्या फायझर आणि मॉडर्नानं दिल्ली सरकारला लस पुरवण्यास नकार दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले. यापूर्वी मॉडर्नानं पंजाब सरकारलादेखील लसीचा थेट पुरवठा करणार नसल्याचं म्हटलं होतं. थेट केवळ केंद्र सरकारला लसी पुरवल्या जातील असं त्यांनी म्हटलं होतं. "आम्ही फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांशी लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली. दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला. केवळ भारत सरकारशी व्यवहार करणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. केंद्र सरकारनं लसींची आयात करावी आणि राज्यांना ती वाटावी अशी विनंती मी करत आहे," असं केजरीवाल म्हणाले. यापूर्वी पंजाबलादेखील लसींचा थेट पुरवठा करण्यास नकार दिल्याची माहिती पंजाबच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली होती. मॉडर्नानं पंजाबला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. तसंच त्यांचा केवळ केंद्र सरकारशी व्यवहार आहे असं त्यांनी सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:49 IST
Coronavirus Vaccine : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली यासंदर्भातील माहिती. थेट लस विकण्यास कंपनीनं नकार दिल्याचं केलं वक्तव्य.
पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत
ठळक मुद्दे थेट लस विकण्यास कंपनीनं नकार दिल्याचं केलं वक्तव्य.यापूर्वी पंजाबलाही दिला होता नकार