शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

GST, नोटाबंदीचं समर्थन करत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले,'नवीन चपलादेखील 3 दिवस चावतात'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:05 IST

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी जीएसटी आणि नोटांबदीचं समर्थन करत म्हटले की, ''नवीन चपलादेखील तीन दिवस चावतात, मग त्या व्यवस्थित होऊन जातात''.

नवी दिल्ली - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी जीएसटी आणि नोटांबदीचं समर्थन करत म्हटले की, ''नवीन चपलादेखील तीन दिवस चावतात, मग त्या व्यवस्थित होऊन जातात''. मध्य प्रदेशच्या एक दिवसाच्या दौ-यावर असताना धर्मेंद्र प्रधान यांनी हे विधान केले आहे.  यावेळी इंदौर येथे प्रसिद्धी माध्यामांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले की, ''लोकांना त्रास झाला. मात्र जीएसटी असो किंवा नोटाबंदी, यामुळे रोजगारावर परिणाम झाल्याची जी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे, ती योग्य नाही. तुम्ही जेव्हा नवीन चप्पल वापरता तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस त्याही चावतात, पण चौथ्या दिवशी त्या अगदी व्यवस्थित होऊन जातात''. 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटी म्हणदे 'गब्बर सिंग टॅक्स' असं म्हणत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देत प्रधान म्हणाले की, ''मी देवाकडे प्रार्थना करेन की त्यांना सद्बुद्धी द्यावी, सत्तेत असताना त्यांनी जीएसटी अंमलात आणण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यांच्या पक्षाला श्रेय दिलं जात नसल्यानं त्यांना समस्या आहे. मात्र आम्ही तर त्यांना श्रेय दिलेलं आहे''  

मोदीजी, जय शहाबद्दल एक वाक्य तरी बोला - राहुल गांधी ‘मोदीजी, ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे तुम्ही म्हणाला होता. जय शहाने भरपूर खाल्ले, आता त्याबद्दल एक वाक्य तरी बोला, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गांधीनगरमधील सभेत पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर हल्ला बोल केला. या वर्षाअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने गुजरातमध्ये राजकीय रण पेटले आहे. अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल या ओबीसी तसेच पटेल समाजाच्या नेत्यांनीही काँग्रेसला साथ देण्याचे ठरवल्यामुळे निवडणूक रंगणार आहे. 

गुजराती आवाज विकत घेऊ शकत नाहीतुम्ही गुजरातचा आवाज विकत घेऊ शकत नाही. तुम्ही गुजराती माणसाला विकत घेऊ शकणार नाही. महात्मा गांधी, सरदार पटेल या गुजरातच्या नेत्यांनी ब्रिटिश महासत्तेला देशातून पळवून लावले आहे हे लक्षात ठेवा. मागील २२ वर्षांपासून गुजरातमध्ये जनतेचे नव्हे, तर पाच ते दहा उद्योगपतींचे सरकार आहे. गुजरातच्या जनतेला रोजगार, चांगले शिक्षणहवे आहे. पण भाजपा सरकार ते देण्यात अपयशी ठरले आहे.

आंदोलकांना विकत घेण्यासाठी भाजपाचे ५00 कोटी : आंदोलन करणा-यांना विकत घेण्यासाठी भाजपाने ५00 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे, असा आरोप पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या तुमच्या योजना अपयशी ठरल्या, पण एका कंपनीने रॉकेटच्या स्पीडने प्रगती केली, असा टोमणाही त्यांनी मोदी यांना मारला. 

टॅग्स :GSTजीएसटीNote BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी